अमेरिकेच्या वक्तव्यावर इराणची तिखट भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |



तेहरान : इराणमध्ये सुरु असलेल्या जनआंदोलनाला अमेरिकेने पाठींबा दिल्यामुळे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण विरोधात वक्तव्य केल्यामुळे इराण सरकारने अमेरिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेचे वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचे असून आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, असे वक्तव्य इराणकडून करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये असलेल्या इराणच्या राजदूतांनी 'राईट टू रिप्लाय'चा अंतर्गत अमेरिकेच्या राजदूत निकी हेले यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. 'कोणत्याही देशाच्या अंतर्गत भागामध्ये सुरु असलेल्या मुद्दावर भडकावू भाषण करणे हे अमेरिकेसारख्या एका जबाबदार देशाला शोभत नाही, परंतु इराणची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा खराब करण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात आहे,' असे इराणने आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले आहे.

इराणमध्ये गेल्या शनिवारपासुन सुरु असलेल्या सरकारविरोधी निदर्शनाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पाठींबा दर्शवला होता. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत निकी हेले यांनी जाहीर पाठींबा दर्शवत, आंदोलनकर्त्यांचे जाहीर कौतुक केले होते. तसेच इतर देशांनी देखील या आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले होते. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या या वक्तव्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@