फेरीवाल्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी जोडणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : महापालिकेने फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोनचा आराखडा तयार करून त्याची कार्यवाही चालविली असतानाच आता नोंदणीकृत सर्व फेरीवाल्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शहरात फेरीवाला धोरणानुसार ९५०० पथविक्रेत्यांची नोंदणी झालेली आहे.
 
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिक महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निश्चित करून तसे फलकही लावण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शहरातील नोंदणीकृत ९५०० पथविक्रेत्यांना निश्चित करून दिलेल्या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया महापालिकेने आरंभली असतानाच आता शासनाने एक परिपत्रक काढत सर्व पथविक्रेत्यांचे मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
 
नोव्हेंबर २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, पथविक्रेता सर्वेक्षणाचे काममुंबई महापालिकेच्या पद्धतीनुसार करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्व फेरीवाल्यांची नोंदणी मोबाईल अॅपद्वारे लिंक करणे अनिवार्य केले आहे. सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक आधार सुविधा केंद्रात जाऊन त्वरित लिंक करून घेण्याचे आवाहन महापालिकेचे उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@