भुजबळ समर्थकांच्या आंदोलनामुळे वाहतूककोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
  
नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळा, बेहिशोबी मालमत्ता आदी आरोपांखाली जवळपास दोन वर्षे तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ भुजबळ समर्थकांकडून आज शक्तिप्रदर्शनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात आली. यामुळे सीबीएस भागात वाहतूककोंडी झाली होती.
 
ईडी सीबीआयने कारवाई केलेले अनेक राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी यांना जामीन मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मनी लॉंड्रिंग प्रकरणातील कलम ४५ हे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र, त्यानंतरही भुजबळ यांचा जामीन होत नसल्यामुळे समर्थक आक्रमक झाले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@