माझ्याकडे देखील अण्वस्त्राचे बटण; ट्रम्प यांचे किम जॉन्गला प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जॉन्ग उन याने काही दिवसांपूर्वी 'अण्वस्त्राचे बटण माझ्या टेबलवरच असते, त्यामुळे अमेरिकेने सावध राहावे' असे वक्तव्य केले होते, त्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कुणीतरी किम जॉन्गला कळवा, माझ्याकडे देखील अण्वस्त्राचे बटण आहे, आणि हे बटण त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली, आणि मोठे आहे, तसेच हे काम देखील करते.
 
 
राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. हुकुमशाह किम जॉन्ग आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक युद्धामुळे अण्वस्त्र युद्धाचे सावट दोन्ही देशांमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
अमेरिकेला उत्तर कोरियाच्या शक्तीची कल्पना नाही. उत्तर कोरियाची अणुशक्ती आता वास्तवात उतरली असून देशाच्या सर्व अणुशस्त्रांची कळ ही माझ्या कार्यालयामध्ये आहे' असा सुचक इशारा किम जॉन्गकडून देण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेने उत्तर कोरियाला हलकेच घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा याचे परिणाम अत्यंत वाईट होतील, अशी धमकी १ जानेवारी रोजी हुकुमशाह किम जॉन्गने अमेरिकेला व पर्यायाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@