‘पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे प्रशासनातील बदल नागरिकांना जाणवतो’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
‘सिध्दी २०१७ संकल्प २०१८’ अभियानात जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे प्रतिपादन
 

चंद्रपूर: राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षभरात चंद्रपूर जिल्हयाने प्रशासनातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य नागरिकाला प्रशासनाच्या योजना, उपक्रमाचा लाभ मिळत असून दृष्टीक्षेपात येणारा बदल या वर्षभरात त्यांनी अनुभवला.
हॅलो चांदा, संगणक प्रशिक्षण, ट्रकींग डॅशबोर्ड, कुक्कुटपालन क्लस्टर, ९९ टक्क्यांवरील शौचालय निर्मिती, विविध आवास योजनेतून घरांची निर्मिती आणि शेतकऱ्यांना महाकर्जमाफीतून मिळालेला दिलासा प्रमुख उपलब्धी ठरल्या आहेत. याशिवाय दारुबंदीची अंमलबजावणी आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा ही गेल्यावर्षीची सिध्दी असून येणाऱ्या वर्षात महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हयाचा संकल्प आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित “ सिध्दी २०१७, संकल्प २०१८ ” या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत आशुतोष सलिल यांनी गेल्यावर्षभरातील उपलब्धी व २०१८ मधील संकल्पाची माहिती दिली. जिल्हा प्रशासनातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी गेल्यावर्षभरात राज्य शासनांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कॉपीटेबल बुक व जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या तीन वर्षातील उपलब्धीची घडीपुस्तिका संदर्भासाठी देण्यात आली. 
 
@@AUTHORINFO_V1@@