मिलिंद एकबोटे यांच्या घरावर आंबेडकर अनुयायांचा मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

 
पुणे :  भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त विरोध होत आहे, तर तो समस्त हिंदु संस्थेचे मिलिंद एकबोटे यांचा. आज त्यांच्या शिवाजीनगर येथील  घरावर आंबेडकर अनुयायांनी मोर्चा नेला आहे, यावेळी सर्व आंबेडकर अनुयायी घोषणा देत आहेत.
 
कोरेगावात भीमाच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने ऐतिहासिक विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये अचानक दगडफेक झाली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, या घटनेमुळे थोड्याच वेळात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठले. यामध्ये मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप आंबेडकर अनुयायांनी केला आहे.
 
 
 
 
दरम्यान काल एकबोटे यांनी एक पत्रक जाहीर करून या घटनेचा निषेध केला आणि समस्त हिंदु आघाडी दलितांशी एकनिष्ठ आहे असे वक्तव्य केले. सोशल मिडियावर अनेक जणांनी घडल्या घटनेला पुण्यातील समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना जबाबदार धरत आहेत. त्यामुळे एकबोटे यांनी सोशल मिडियावर एक निवेदन दिले आहे व त्याचा एक व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे. तसेच समस्त हिंदू आघाडीने एक अधिकृत पत्रक काढून या प्रकाराची निंदा केली.
 
 
 
 
मात्र आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देत ठिकठिकाणी मोर्चे आणि प्रदर्शने करण्यात आली. एकबोटे यांच्याघरावर मोर्चा नेण्यात आला आहे, तसेच प्रदर्शने करण्यात आली. दरम्यान काल एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@