जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 

 

         सकल मराठा क्रांती मोर्च्यातील नेत्यांची मागणी

 
पुणे: भीमाकोरेगाव प्रकरणात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आज सकल मराठा क्रांती मोर्च्यातील नेत्यांनी केली आहे. आज पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी वरील मागणी केली आहे. भीमाकोरेगाव प्रकरणासंदर्भात आज पुणे येथे सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे एक बैठक घेण्यात आली या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय आज या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
 
 
भीमा-कोरेगाव येथे हे दोन्ही गट समोरासमोर येणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती तसेच आता सध्या हे प्रकरण जनतेने शांततेत घ्यावे तसेच आणि जातीय तेढ निर्माण करू नये असा सल्ला यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला. मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले, त्यामुळे आम्ही कधीही हिंसाचाराचे समर्थन करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. हिंसा पसरविणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात यावा तसेच त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
 
 
 
महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी तसेच या घटनेच्या सूत्रधारावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे असे सकल मराठा क्रांती मोर्च्याच्या नेत्यांनी यावेळी म्हटले. या घटनेची काळजी मराठा लोकांनी, दलित समाजाने घ्यावी तसेच राज्यात शांतता राखावी अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. 
@@AUTHORINFO_V1@@