खासदार महोत्सव : नागपुरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी - मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2018
Total Views |
 
 
नागपूर :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सव विविध बहारदार कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला खासदार महोत्सव हा नागपुरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच ठरला आहे. हा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ईश्वर देशमुख क्रीडा नगरीत आयोजित सांगता समारोहात बोलत होते.
 
 
 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार हेमामालिनी, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, उद्योगपती नरेंद्र हेटे, डॉ. विपीन कामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारोहाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा महोत्सव गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडणारा महोत्सव ठरला आहे. नितीन गडकरी यांनी हा महोत्सव आयोजित करून नागपूरकरांना सांस्कृतिक मेजवानीच दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@