सर्वोच्च न्यायालयाकडून अबू सालेमची अपील मान्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2018
Total Views |
 
 
 

 
 
 
 
नवी दिल्ली : कुख्यात गुंड आणि १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याने न्यायालयात दिलेली अपील आज सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.
 
 
 
 
सप्टेंबर २०१७ मध्ये अबू सालेम आणि करिमुल्ला खान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवाया यांसाठी अबू सालेमला दोषी ठरवण्यात आले होते. या संदर्भात शिक्षा कमी करण्यासंबंधी अबू सालेमने शिक्षा कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केले होते, ती मान्य करण्यात आले आहे. 
 
 
 
 
बॉम्बस्फोटातील घटनेमध्ये ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशी तर रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अबू सालेम याला पोर्तुगालकडून हस्तांतरित कऱण्यात आले होते. त्यामुळे भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील कारारानुसार त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्याच कारणास्तव केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनेही त्याला जन्मठेप मिळावी, अशी मागणी केली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@