नवमतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा-मनोहर गव्हाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2018
Total Views |
 
राष्ट्रीय मतदार दिन साजरा
 
 
चंद्रपूर: आपलं मत हे मौल्यवान असल्याने सर्वांनी मतदानात सहभाग नोंदवणे गरजेचे असून त्यामध्ये नवमतदारांनी अधिक सक्रीय सहभाग घेवून देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने बचत साफल्य भवन येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सीमा अहिरे यांनी प्रास्ताविक करतांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनाकांवर आधारीत चंद्रपूर जिल्हयातील राजूरा, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर, वरोरा व चंद्रपूर या सहाही विधानसभा मतदार संघातील मतदार यादींचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोंबर २०१७ ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्हयातील एकूण २०५५ मतदान केंद्रावर राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये जिल्हयांत नव्याने एकूण २२ हजार १७७ मतदारांची नोंदणी केली असून २३ हजार २२९ मय्यत, दुबार व स्थानांतरीत मतदारांची नावे कमी करण्यात आलेली आहे. 
 
तसेच ६ हजार ४७९ मतदारांचे नावातील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हयात पुरुष मतदार ९ लाख ३७ हजार ५३, स्त्री मतदार ८ लाख ८० हजार ८४१ व इतर मतदार (तृतीयपंथी) ११ असे एकूण १८ लाख १७ हजार ९०५ मतदार असून २०१७ च्या संभाव्य लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारांचे प्रमाण ६९.३३ इतके असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार नोंदणी पासून कोणीही वंचित राहू नये व शंभर टक्के नोंदणी व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सीमा अहीरे यांनी सांगितले. मतदार नोंदणीचा संदेश युवक-युवतींनी घरोघरी पोहचवावा, असे आवाहन त्यांनी केले. 
 
@@AUTHORINFO_V1@@