'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाचा समारोप करणारा कार्यक्रम अर्थात 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम आज नवी दिल्ली येथील राजपथावर संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तिन्ही दलाचे सैन्य आणि केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण उपस्थित होते.
 
 
 
 
  
 
मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पडला असून शेवटी बँडच्या धूनमध्ये राष्ट्रध्वजाला मानात उतरविण्यात आले. यावेळी बँडने आपल्या विविध धून प्रदर्शित केल्या. यावेळी भारतीय संस्कृतीचे दर्शन या धुनांमध्ये दर्शविण्यात आले. दिल्ली येथील विजय चौकात हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. 
 
 
 
 
 
विविध बँडच्या गटांनी आज मनमोहक धुनांचे प्रदर्शन केले. यावेळी दिल्लीकर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला जातो. तिन्ही दलाचे सैन्य मिळून हा कार्यक्रम सादर करीत असून हा कार्यक्रम पार पडल्यावर प्रजासत्ताक दिन संपन्न झाला असे समजले जाते. 
@@AUTHORINFO_V1@@