उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'मॉब लिंचिंग'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2018
Total Views |

'भारतमाता की जय' म्हटल्यामुळे जमावाने केली हत्या

परिस्थिती तणावपूर्ण तरीही नियंत्रणात




काशगंज (उत्तर प्रदेश) : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 'भारत माता की जय' अशी घोषणा दिल्यामुळे दोन युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना उतरप्रदेशमध्ये घडली आहे. चंदन गुप्ता आणि राहुल असे युवकाचे नाव असून काही समाजकंटकांनी तिरंगा यात्रेवर केलेल्या हल्लामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखीन दोन जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून काशगंजमध्ये दंगली उसळ्या असून अनेक ठिकाणी हिंसक कारवाया आणि जाळपोळ करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४९ जणांना ताब्यात घेतले असून संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी आजूबाजूच्या परिसरात तणाव कायम आहे.



काशगंजमधील कसाई मार्केट येथे २६ जानेवारीला तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कसाई मार्केटमधील काही समाजकंटकांकडून या यात्रेला विरोध केला. तसेच यात्रेवर दगडफेक आणि गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये चंदन गुप्ता हा गंभीररीत्या जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी दुसऱ्या समाजाच्या जमावावर हल्ला केला. परंतु यावेळी तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आल्यामुळे परिस्थिती थोडी निवळली. पण थोड्याच वेळात यात्रेवर दगडफेक केलेल्या जमावाने पुन्हा एकदा चौकातील इतर नागरिकांवर आणि दुकानांवर हल्ला करत जाळपोळ करण्यास सुरुवात केली. यामध्ये चौकातील काही दुकांना आणि वाहनांना आग लावण्यात आली. यावर पहिल्या जमावातील नागरिकांनी चंदनच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. परंतु काशगंजचे आमदार देवेंद्र सिंग राजपूत यांनी त्यांची समजूत काढली व दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.









परंतु अंत्यसंस्काराहून आल्यानंतर पुन्हा एकदा शहरात दंगल भडकली. यानंतर पोलिसांनी राखीव दलाच्या सहाय्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यासाठी काशगंजमध्ये संचारबंदी तसेच इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. जिल्ह्याचे सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरील वाहनांची चौकशी केल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली असून संपूर्ण शहरावर ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवले जात आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ४९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या एका आरोपियाच्या घरात एक पिस्तुल आणि जिवंत बॉम्ब सापडल्यामुळे परीस्थिती आणखीन तणावपूर्ण बनली आहे.




@@AUTHORINFO_V1@@