...आणि रॉजरला झाले अश्रू अनावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2018
Total Views |

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररचे दणदणीत यश

२० ग्रँड स्लॅम मिळवणारा जगातील पहिला खेळाडू




मेलबर्न : येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला असून क्रोएशियाई खेळाडू मरिन सिलिक याच्यावर ६-२ ६-७(५) ६-३ ३-६ ६-१ गुणांनी मत करत स्पर्धेचे अंतिम विजेते पद पटकावले आहे. तसेच २० ग्रँड स्लॅम मिळवणारा रॉजर हा जगातील एकमेव खेळाडू ठरला असून सामन्याचा किताब स्वीकारत असताना आपल्या चाहत्यांचे प्रेम पाहून रॉजरला आपले अश्रू देखील अनावर झाले होते.

अत्यंत अटीतटीच्या अशा या सामन्यामध्ये रॉजरने सिलिकवर सलग तीन वेळा आघाडी घेतली होती. सिलिकने देखील रॉजरला काट्याची टक्कर देत विजयासाठी बराच वेळ झुंजत ठेवले होते. परंतु आपल्या अनुभवी खेळीतून रॉजरने शेवटच्या सेटमध्ये सिलिकचा पराभव करत सलग पाचव्यांदा ऑस्ट्रेलिया ओपनच्या किताब आपल्या नावावर केला, तसेच आपल्या कारकिर्दीतील २० वा ग्रँड स्लॅम देखील मिळवला.

या विजयानंतर रॉजरला किताब स्वीकारण्यासाठी मंचावर बोलावण्यात आले. यावेळी रॉजरने आपल्या छोट्या भाषणामध्ये आपल्या यशस्वीसाठी झुंजलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी रॉजरचे भाषण ऐकून उपस्थित सर्व प्रेक्षकांनी जाग्यावर उभे राहून रॉजरसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. चाहत्यांचे हे प्रेम पाहून यावेळी रॉजरला आपले अश्रू अनावर झाले. विश्वविक्रम करणाऱ्या या खेळाडूच्या डोळ्यात पाणी पाहून उपस्थित प्रेक्षक देखील गहिवरून गेले होते.

ऑस्ट्रेलिया खुल्या स्पर्धेत मिळालेल्या या यशामुळे रॉजर फेडरर पुरुष एकेरीतील जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे. त्याच्या या यशासाठी जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@