मोर्णाच्या स्वच्छतेसाठी अकोलकरांनी कसली कंबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2018
Total Views |


अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु करण्यात आलेल्या 'मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून सलग दुसऱ्या आठवड्यात देखील अकोलकरांनी नदी स्वच्छतेसाठी मोठ्या संख्याने पुढकार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गेल्या आठवड्यात मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील सामन्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावी, असे आवाहन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या आठवड्यात अकोलकरांनी मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात देखील अकोलकरांनी या मोहिमेला उदंड प्रतिसाद देत यामध्ये आपला सहभाग नोंदवला.

नागरिकांच्या या प्रतिसादाचे जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी कौतुक करत, या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. नागरिकांचे १३ जानेवारीपासून सुरुवात झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी आज दिलेला प्रतिसादही कौतुकास्पद होता. नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार आहे. यापुढेही दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. जोपर्यंत नदी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत स्वच्छता मोहिम सुरुच राहिले, असे पाण्डेय यांनी यावेळी म्हटले.
 
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली.
@@AUTHORINFO_V1@@