इंडोनेशिया मास्टर्स : सायनाचा ताईजुयिंग कडून पराभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2018
Total Views |

 
इंडोनेशिया :  जुनी प्रतिद्वंद्वी आणि जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाची बॅडमिंटन खेळाडू ताईजुयिंग हिने प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम सामन्यात पराभव केला.
 
 
 
 
पायाला झालेल्या इजेतून सावरल्यानंतर सायना पहिल्यांदाच आंततराष्ट्रीय स्तरावर खेळत होती. २७ मिनिटे चाललेल्या या खेळात ताईजुयिंग हिने ९-२१, आणि १३-२१ अशा अंकानी सायनाला पराभूत केले.
 
 
 
याआधी देखील सायना ताईजुयिंगकडून ९ वेळा पराभूत झाली आहे. "ताईजुयिंग हिच्या सोबत पोडियमवर उभे राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद आहे, मात्र या सामन्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, संपूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा मैदानात उतरणार." या शब्दात सायनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
खेळाच्या सुरुवाती पासून ताईजुयिंगने आपले नियंत्रण खेळावर कायम केले. ४-० ने आघाडीखेत तिने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. तिच्या खेळाला सायनेदेखील त्याच ताकदीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सामन्याचे नियंत्रण ताईजुयिंगने आपल्याकडे ठेवल्याकारणाने हा सामना ती जिंकली.
@@AUTHORINFO_V1@@