कायदेपंडित पद्मभूषण प्रा. वेदप्रकाश नंदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
भारत सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारात कायदेपंडित प्रा. वेदप्रकाश नंदा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि शिक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, ते हिंदू स्वयंसेवक संघाचे उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाचे संघचालक म्हणून कार्यरत आहेत.
 
 
अमेरिकेच्या जॉन एव्हान्स विद्यापीठात आणि डेन्व्हर विद्यापीठात कायदा या विषयाचे प्राध्यापक म्हणून वेदप्रकाश नंदा हे कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय कायदे विषयक अभ्यासक्रम कार्यक्रमाचे ते संस्थापक सदस्य आहेत तसेच वेदप्रकाश नंदा आंतरराष्ट्रीय कायदा संस्थेचे ते संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 
 
१९६५ सालापासून डेन्व्हर विद्यापीठात कायदा विषयक क्षेत्रात काम करणारे नंदा यांनी आंतरराष्ट्रीय न्यायिक संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या त्या संस्थेचे मानद अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर 'अमेरिकन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ' या संस्थेचे देखील ते मानद उपाध्यक्ष राहिले आहेत, अश्या त्या संस्थेचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
 
 
आपल्या आंतरराष्ट्रीय कायदा या विषयात जगभरात प्रमुख पद भूषविलेले प्राध्यापक नंदा यांना दिल्ली विद्यापीठातर्फे देखील सन्मानित करण्यात आले होते. जपानच्या एका विद्यापीठातर्फे आणि बुंदेलखंड विद्यापीठ, झांसी तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. २२ पुस्तकांचे ते सह-लेखक आहेत, त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायदेविषयक मासिकांत ते लिहित असतात.
 
 
@@AUTHORINFO_V1@@