कला साधक: पद्मश्री योगेंद्र बाबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
हजारो कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, ‘संस्कार भारती’ या संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ प्रचारक योगेंद्र बाबा यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
 
योगेंद्र यांचा जन्म ७ जानेवारी १९२४ रोजी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध वकील विजय बहादूर श्रीवास्तव यांच्या घरी झाला. ते अवघे २ वर्षांचे असताना त्यांची आई स्वर्गवासी झाली. वकील साहेब कॉंग्रेस आणि आर्य समाज यांच्या कार्यक्रमात सक्रीय होते. घराजवळ जेव्हा संघाची शाखा सुरु झाली तेव्हा बाल योगेंद्र देखील तेथे जाऊ लागला. याच कालावधीत त्यांच्या संपर्क संघाचे गोरखपूर मधील ज्येष्ठ प्रचारक नानाजी देशमुख यांच्याशी आला. आईचे छत्र लहानपणीच हरविले असताना नानाजी देशमुख यांच्या मातृहृदयी प्रेमामुळे ते अधिक प्रभावित झाले. शिक्षण पूर्ण झाल्याबर त्यांनी पूर्ण वेळ संघाचा प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
 
 
१९४५ पासून गोरखपूर, प्रयाग, बरेली, बदायु, सीतापुर या ठिकाणी जाऊन संघाचे कार्य त्यांनी केले. संघाचे कार्य करत असताना देखील त्यांच्यातील कलाकार त्यांना नेहमीच काही नाविन्यपूर्ण कलाकृती करण्याची प्रेरणा देत. देशाचे विभाजन झाले त्यावेळी त्यांनी एक प्रदर्शनी बनविली. या प्रदर्शानीची खूप प्रशंसा झाली. त्यानंतर मग प्रदर्शानीची मालिका सुरूच राहिली. शिवाजी. धर्म गंगा, जनता कि पुकार, जलता काश्मीर, संकट मे गोमाता, १८५७ के स्वाधीनता संग्राम कि अमर गाथा या त्यांच्या प्रदर्शनी विशेष गाजल्या.
 
 
त्यांच्यातील या सुप्तगुणांची दखल घेत त्यांच्या नेतृत्वाखाली सन १९८१ साली संघाने ‘संस्कार भारती’ या संघटनेची स्थापना केली. योगेंद्र यांनी पहिल्यापासून मोठ्या मोठ्या कलाकारांना संघटनेशी जोडण्याचा आग्रह धरला नाही. अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना त्यांनी व्यासपीठ दिले. या सर्वांची एकत्र मोट बांधून त्यांनी संस्कार भरतीचे देशव्यापी काम उभे केले. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवीत केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@