इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम सामन्यात सायना नेहवाल दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
जकार्ता : आघाडीची भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्सच्या सेमी-फायनल सामन्यात थायलंडच्या रातनाचोक इंतानोनला पराभूत करून अंतिम सामन्यात दाखल झाली आहे. इंतानोन ही जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन म्हणून ओळखली जाते. तिचा पराभव करून सायनाने मोठी कामगिरी केली आहे.
 
 
४९ मिनिटे चाललेला हा खेळ सायनाने २१-१९, २१-१९ अशा फरकाने हा सामना जिंकला. तिची आजची खेळी दमदार असून सामन्याची सुरुवात देखील मोठ्या उत्साहात केली होती. सामना सुरुवातीपासून सायनाने आपल्या हाती राखल्याचे दिसून आले.
 
 
 
रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सायना ला जगातील क्रमांक १ ची बॅडमिंटनपटू ताई जु यिंग किंवा चीनची बिंगजियाओ यांना टक्कर द्यावी लागणार आहे. २७ वर्षीय सायनाने या मालिकेत भारतीय ऑलम्पिकपटू पी. व्ही. सिंधूला देखील क्वार्टर फायनल सामन्यात पराभूत केले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@