समाजभान जपणारा उद्योजक: पद्मश्री रामेश्वरलाल काबरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |
 
 
नुकतेच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारात एक नाव आहे ते रामेश्वर लाल काबरा. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रामेश्वरजी इलेक्ट्रिक वायर निर्मिती क्षेत्रातील अग्रणी अशा ‘आर.आर. ग्रुप’ या उद्योगसमुहाचे प्रमुख आहेत. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे भारतातील दुर्गम भागातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी काम करणाऱ्या ‘एकल विद्यालय’ (एका शिक्षकाची शाळा) या चळवळीशी ते जोडले गेले आहेत.
 
त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३३ ला आजच्या बांगलादेशात झाला होता. तेथून ते नेपाळला गेले. पुढे इंदोर आणि १९६५ साली शेवटी मुंबईमध्ये स्थायिक झाले. सुरवातीला इलेक्ट्रिकल वस्तूंचे छोटे दुकान त्यांनी सुरु केले. १९८६ साली त्यांनी प्रथमच वायंडिंग वायर बनविण्याचा कारखाना सुरु केला. कठीण परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या बळावर त्यांनी १९८९ मध्ये भारतातील पहिला ‘डस्ट फ्री कॉपर प्रोडक्ट’ चा कारखाना सुरु केला. आज त्यांचा ‘राम रत्न (R.R.) ग्रुप’ भारतातील इलेक्ट्रिकल वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी ग्रुप आहे. सामाजिक जाणीवेपोटी त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी सर्व व्यवसाय आपल्या मुलांच्या हाती सोपवून ‘एकल विद्यालया'च्या कामात स्वत:ला वाहून घेतले.
 
रामेश्वरजी एकल विद्यालयाच्या संस्थापक सदस्यांपैकी आहेत. एकल विद्यालय हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी कठीण परिश्रम घेतले आहेत. आज एकल विद्यालयाचे काम ६० हजार खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या ते ‘Friends of Tribal Society’ या संस्थेचे काम बघतात. या संस्थेकडे ‘एकल विद्यालय’ या उपक्रमाला आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे.
@@AUTHORINFO_V1@@