बहुआयामी व्यक्तिमत्व पद्मविभूषण पी.परमेश्वरन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |
th
 
भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित परमेश्वरन हे भारतीय विचार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केरळ मधील ज्येष्ठ प्रचारक म्हणून त्यांना ओळखले जाते. साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
केरळच्या अलाप्पूझा जिल्ह्यातील चेर्थला येथे त्यांच्या १९२७ साली जन्म झाला. थिरूअनंतपुरम येथील विद्यापीठातुन त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून हिंदू धर्माबद्दल असणाऱ्या आस्थेपोटी ते विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनेच्या कामात सक्रिय राहिले. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी १९५० साली पूर्ण वेळ प्रचारक जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या सांगण्यावरून त्यांनी जन संघाची संघटन मंत्री म्हणून १९५७ साली जबाबदारी स्वीकारली. पुढे जन संघाचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावास देखील भोगला आहे.
 
 
पुढे जाऊन त्यांनी सक्रीय राजकारणातून सन्यास घेतला आणि सामाजिक, वैचारिक क्षेत्रात काम केले. दिल्लीतील ‘दीनदयाळ शोध संस्थान’ या संस्थेचे मागील चार वर्षांपासून ते संचालक म्हणून काम पाहत आहेत. याव्यतिरिक्त ते International Forum for Indias Heritage या भारतातील प्राचीन ज्ञान परंपरेचा अभ्यास करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेली काही प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे 'Marx and Vivekananda', 'Aurobindo, the prophet of future,' 'Sri Narayana Guru, the prophet of renaissance' आणि 'The changing society & changeless values'.
 
 
भारतातील प्राचीन ज्ञान परंपरा या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना २००४ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवित केले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@