कुष्ठनिवारक बाप्पा: पद्मश्री दामोधर गणेश बापट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
कुष्ठरोग्यांच्या सेवेत आपले आयुष्य खर्च करणारे दामोधर गणेश बापट हे मुळचे अमरावती जिल्यातील पथरोट गावचे निवासी आहेत. नागपुरला त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या मृत्यूनंतर छोटा व्यवसाय सुरु केला. स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातून प्रेरणा घेवून समाजासाठी काही करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. वनवासी कल्याण आश्रमाचे बाळासाहेब देशपांडे यांच्या सोबत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते १९७१ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत.
 
छत्तीसगढ आणि ओरिसा राज्यात काम करताना येथील कुष्ठरोग्यांची समस्या त्यांच्या लक्षात आली. कुष्ठरोग्यांबद्दल असलेला गैरसमज आणि त्यापोटी कुष्ठरोग्यांची होणारे हाल बघितल्यानंतर त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. आज वयाचा ८२ व्या वर्षी देखील ते या कामात आहेत. ४५ वर्षांपासून छत्तीसगढ मधील जांजगिर जिल्ह्यातील चंपा येथे भारतीय कुष्ठ निवारक संघ द्वारा चालविण्यात येणाऱ्या कुष्ठ आश्रमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
 
 
कुष्ठ आश्रमाची स्थापना १९६२ साली सदाशिवराव गोविंदराव कात्रे यांनी केली होती. १९७२ पासून दामोधर बापट या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करू लागले. १९७५ पासून ते आश्रमाचे सर्वेसर्वा आहेत. आश्रमाची ७३ एकर जागा असून या ठिकाणी सर्व प्रकारची शेती केली जाते ज्यामुळे हे आश्रम आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. आतापर्यंत कुष्ठरोग्यांसाठी शिबीर घेवून २६ हजार रुग्णांवर उपचार केले आहेत.
 
पद्मश्री सन्मानाबद्दल त्यांना विचारले असता ’भारतात जन्म घेतला हाच माझा पद्मश्री पुरस्कार आहे.’ असे ते म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@