एनसीसी आणि एनएसएस च्या स्वयंसेवकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी कलाकारांशी संवाद साधला. भारत विविधतेने नटलेला देश आहे, यात प्रत्येकाकडून शिकण्यासारखे खूप आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, आपल्या आसपास जे अंधपणे वावर सुरु आहे, तो अजिबात योग्य नाही, घडणारा बदल अडथळा निर्माण करत असल्यासारखे काहींच्या भावना आहेत.
 
 
नवी दिल्ली येथे पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी आज एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी कलाकार मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. सर्व तरुण विद्यार्थी यावेळी पंतप्रधान यांच्याशी संवाढ साधण्यास तेवढेच उत्सुक देखील दिसून आलेत.
 
 
 
आपल्या देशाच्या सैन्यबळाचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्या सर्व शुराविरांच्या गाथा आपल्याला माहिती असल्यापाहिजेत असा आग्रह पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांपुढे धरला. मोदी पुढे म्हणाले की, याप्रमाणेच पोलीस दलातील शुराविरांची माहिती मिळवली पाहिजे. आपल्या देशाला उत्तम बनवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या सर्वांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे पंतप्रधान यांनी सांगितले.
 
 
जेव्हा महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जाईल, तेव्हा तरुणांनी देशाला स्वच्छ बनवण्यासाठी आघाडी घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी स्वच्छ भारत अभियानात सर्वांना सक्रीय सहभागी व्हायला सांगितले.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@