काबुलमध्ये बॉम्बस्फोट, ४० नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
काबुल: अफगाणिस्थानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये आज बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या मिळत असून यात ११० नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असून जखमी नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे.
 
काबुल येथील परिसरात अचानक एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. यामुळे आसपासच्या परिसरात एकच झुंबड उडाली. सगळे नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले असतांना बचाव पथक देखील लवकरच घटनास्थळी पोहोचले. या पथकाने आजूबाजूच्या परिसराचा शोध घेतला असता हा बॉम्बस्फोट असून यात ४० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
 
भारतीय दूतावासच्या कार्यालयाजवळ हा बॉम्ब स्फोट घडवून आणला गेला आहे. या स्फोटाची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. हा आत्मघातकी हल्ला होता असे म्हटले जात आहे. बॉम्ब मानवधारित माणसाच्या मदतीने हा स्फोट घडवून आणला गेला आहे. भारतीय दूतावास कार्यालयातील नागरिक सगळे सुरक्षित असून सध्या घटनास्थळी बचाव कार्य जोरात सुरु आहे.
 
काबुलमध्ये झालेला हा दुसरा आत्मघातकी हल्ला सांगितला जात आहे. याआधी देखील असा हला करण्यात आला होता. 
 
@@AUTHORINFO_V1@@