भारत वि द. आफ्रिका कसोटी : शमीच्या गोलंदाजीने घेतली दक्षिण आफ्रिकेची विकेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा विजय रथ तिसऱ्या कसोटीत यशस्वीपणे रोखला. ५ बळी घेत आफ्रिका संघाला १७७ धावांवर गुंडाळून ६३ धावांनी भारताने हा सामना जिंकला.
 
 
मोहम्मद शमीने ५ बळी घेत १२ षटकांत २८ धावा दिल्या असून, त्यापाठोपाठ इशांत शर्माने १६ षटकांत ३१ धावा देऊन २ बळी चीत केले. जसप्रीत बुमराहने देखील सर्वाधिक २१ षटकांत ५७ धावा देऊन २ बळी घेण्यात यश मिळविले.
 
 
 
या सामन्यात पहिल्या डावात भारताने १८७ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर देत असताना दक्षिण आफ्रिका संघ १९४ धावा करत बाद झाला. त्यात भारतीय गोलंदाजांनी उत्तम खेळी केली होती. बुमराहने त्यात ५ बळी बाद केले होते. दुसऱ्या डावात भारताकडून २४७ धावा करण्यात आल्या. यात अजिंक्य राहणे, कर्णधार विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली.
 
 
दक्षिण आफ्रिका संघाला २४० धावांचे आव्हान देण्यात आले मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकी खेळाडू टिकू शकले नाहीत, परिणामी १७७ धावांवर संपूर्ण आफ्रिका संघ बाद झाला. दक्षिण आफ्रीकेद्वारे डीयान एल्गरने सर्वाधिक ८६ धावा केल्या.
यासोबतच हि कसोटी मालिका संपली असून दक्षिण आफ्रिका २ आणि भारत १ अशा फरकाने दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेवर आपले नाव कोरले. तर अंतिम सामना जिंकून भारताने मालिकेत वापसी साधली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@