आयपीएल क्रिकेट: अकराव्या हंगामाच्या लिलावाला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
पहा कोणता खेळाडू सगळ्यात महाग 
 
 
बंगळूरू: गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात आयपीएल क्रिकेटच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे. बंगळूरू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे.
 
 
 
 
 
यावर्षी आयपीएलचे अकरावे हंगाम असून एकाहून एक खेळाडूंवर मोठ्या रकमेची बोली लावली जात आहे. २७ आणि २८ असे दोन दिवस हा लिलाव सुरु असणार आहे आणि ज्या खेळाडूंनी यावर्षी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले अश्या खेळाडूंवर सगळ्यांच्या नजरा असणार आहे.
 
 
 
 
 
या अकराव्या हंगामासाठी एकूण ५७८ खेळाडूंचा लिलाव होणार असून यात ३६० खेळाडू हे भारतीय खेळाडू असणार आहेत. तर २१८ हे परदेशी खेळाडू असणार आहेत. या हंगामात देखील भारतीय खेळाडू सगळ्यात जास्त प्रमाणात असणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
ऍरोन फिंच याच्यावर किंग्ज इलेवन पंजाबसाठी ६ कोटी २० लाखांची बोली 
डेविड मिलर याच्यावर किंग्ज इलेवन पंजाबसाठी ३०० लाखांची बोली 
ब्रेंडन मॅक्युलम याच्यावर रॉयल चॅलेंजरसाठी ३ कोटी ६० लाखांची बोली 
ख्रिस लिन याच्यावर कोलकाता नाईट रायडर्ससाठी ९ कोटी ६० लाखांची बोली 
केदार जाधव याच्यावर चेन्नई सुपर किंग्जसाठी ७ कोटी ८० लाखांची बोली 
युसुफ पठाण याच्यावर सनरायजर्स हैदराबादसाठी १ कोटी ९० लाखांची बोली 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@