कैरोलीन वोजिनयाकी ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |

 
 

मेलबर्न :
जगातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटात डेन्मार्कच्या कैरोलीन वोजिनयाकीने विजेतेपद पटकावले आहे. सिमोना हालेप या रोमानियाच्या टेनिसपटूला हरवून कैरोलिनाने हा किताब पटकावला आहे.
जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप बरोबरचा कैरोलिनाचा खेळ खूप रोमहर्षक होता. दोन तास ५० मिनीटे चाललेल्या या खेळात कैरोलिनाने ७-६, ३-६ आणि ६-४ अश्या गुणांनी हालेप हिचा पराभव केला आहे.
या विजयाबरोबरच कैरेलिना वोजिनयाकीने आपले पहिले ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. तसेच या विजयामुळे वोजिनयाकीने सिमोना हालेप हिला जागतिक क्रमवारीत मागे टाकून अव्वल स्थानावर आपले नाव कोरले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@