प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |

दिल्लीसह संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह





नवी दिल्ली : 
 देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आज राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आसियान देशांचे प्रमुख तसेच केंद्रीय मंत्र्यांसह देशभरातील अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थित हा कार्यक्रम  पार पडला.
  
 
आज सकाळी १० वाजता सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली व राजपथवरील संचालनाला सुरुवात झाली. भारतीय संरक्षण दलाच्या विविध रेजिमेंटसनी राष्ट्रपती कोविंद आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यानंतर विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात येत आहे. 

भवनावर या कार्यक्रमानिमित्त आकर्षक विद्युत रोषणा करण्यात आली असून राष्ट्रपती भवनाचा संपूर्ण परिसर काल रात्री आकर्षक रोषनाईने उजळून निघाला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवन ते लाल किल्ला हा सर्व परिसर सजविण्यात आला आहे.  परेड सुरु असताना नागरिकांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी येथील रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. लाल किल्ल्याचा परिसर देखील विशेष पद्धतीने सजविण्यात आला असून कार्यक्रमानिमित्त संपूर्ण दिल्ली शहरामध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. 


नवी दिल्लीबरोबर संपूर्ण देशामध्ये आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीपासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. शाळा-महाविद्यालयांसह, सरकारी कार्यालयांमध्ये आज सकाळीच ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काही स्वयंसेवी संस्थांकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीका देखील या कार्यक्रमात मोठ्या संख्याने सामील होत असून जागोजागी नागरिकान आणि तरुणांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.



प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण  : 
 
 
@@AUTHORINFO_V1@@