विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |




अवंती : मेधाकाकू, आज न एक गंमत झाली. आज शाळेतून येताना, मी म्हणीमधे वापरलेल्या गावाच्या-शहरांच्या नावाचाच विचार करत होते. घरी आल्यावर लक्षात आले अजून आदित्यचे पतंग संपलेले नाहीत. अगं त्याने सगळे पतंग आणि मांज्याच्या ५/६ फिरक्या असे सगळे माझ्या कपाटावर रचून ठेवलंय. मी सकाळीच त्याला म्हटले आता झाली ना संक्रांत... मग काढ आता सगळे पतंग. तर मला म्हणाला, ‘धड्डा’ आणि ‘चिल’ मधले अजून चार ‘लंगोटदार’, चार ‘टोकदार’, तीन ‘सब्बलदार’, दोन ‘पलटेदार’ आणि एकेक ‘मुछकडा’, ‘आंखेदार’, ‘चांददार’ आणि काही ‘चिन्नाकडी’ अजून शिल्लक आहेत.
हे ऐकून प्रथम मी पार गोंधळून गेले, मग सावकाशपणे त्याने समजावले की, ही सारी पतंगाची नावे आहेत. त्यांचे लहान मोठे आकार, रंगसंगती आणि त्यातील चिन्हांवरून त्यांना अशी नावे दिलेली आहेत. कित्ती मस्त नावे. मेधाकाकू, तुला माहितीयेत का पतंगाची अशी नावे...? ‘धड्डा’ म्हणजे खूप मोठा पतंग तर ‘चिल’ म्हणजे खांद्यावर रुंदी जास्त असलेला आणि ‘चिन्नाकडी’ म्हणजे लहान मुलांसाठीचा छोटासा पतंग, आणि अजून खूप नावे या पतंगांची. टूक्कल, शेपटाड, बॉम्बेटॉप, तागाभरी...!!

मेधाकाकू : अरेच्या अवंती, हे तर मलाही माहित नव्हते. छान झाले तू विषय काढलास. नाहीतर आजपर्यंत पतंग उडतानाची मजा फक्त आपण पहात आलोय. त्यांनाही अशी नावे आहेत हे माहीतच नव्हते आपल्याला. बघ, कान आणि डोळे उघडे ठेवले की, अशा नव्या गोष्टी शिकता येतात.

अवंती : मस्त... मस्त.. मस्त मेधाकाकू. आदित्यामुळे आज उगाच माझी कॉलर ताठ झाली. आज आपला प्रजासत्ताक दिन. शाळेतला कार्यक्रम मस्त साजरा झालाय आज. या दिवसाला साजेशा काही म्हणी असायलाच पाहिजेत. माझी खात्रीच आहे तशी. सांग बरे काहीतरी नवे आजच्या दिवशी...!!

मेधाकाकू : अरे व्वा... खरंच खूप छान छान लोकश्रूती आहेत अशा महत्वाच्या राष्ट्रीय सणांच्या संदर्भात. मात्र त्या उगाच खोटे कौतुक करणाऱ्या लोकोक्ती नाहीत. त्या त्या काळातील वास्तवाचे योग्य संदर्भ घेऊन सतत आपले प्रबोधन करण्याचे काम या लोकोक्ती करत राहिल्या आहेत.
तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा.
मेधाकाकू : असे बघ अवंती, ही म्हण खरे म्हणजे हा निव्वळ योगायोग म्हणायला हवा. मात्र वर्तमानकाळातील, देशातील राजकीय नेतृत्वातील बदल लक्षात घेतले तर आजची ही म्हण निव्वळ एक यागायोग नाही असे लक्षात येते. जवळपास सात दशके ज्या राजकीय पक्षाने देशाचे नेतृत्व केले त्यांचे निवडणूक चिन्ह गाय आणि तिचे वासरू असे होते आणि त्यांचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे आपले प्रजापती होते. आज हे चिन्ह बदलून त्या पक्षाने हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह स्विकारले आहे. आज या पक्षाचे पक्षाध्यक्ष म्हणून या पदावर नेमणूक झालेले गृहस्थ, आपल्या देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्ने बघत आहेत मात्र ते पंतप्रधान बनण्याची शक्यता अजिबात नाही. गाय, वासरू असे निवडणूक चिन्ह आजही स्वीकृत असते आणि हे गृहस्थ पंतप्रधान बनले असते तर मात्र ही म्हण वास्तवात आलेली दिसली असती पण सुदैवाने आज ते शक्य नाही...!!

अवंती : ओहो... मेधाकाकू... काय विलक्षण आहे, ही म्हण आणि आपल्या देशातील राजकीय नेतृत्वाचे वास्तव यांचा होणारा लपंडाव. लोकश्रुतींचे असे भावार्थ आणि गूढांर्थ वास्तवाला किती स्पर्श करून जातात. आज पुन्हा एकदा तू अवाक केलेस मला.

मेधाकाकू : अरे व्वा... एकदम मस्त बोलतीयेस आज अवंती. आता काही छानसे लिहायला लागशील आता असे वाटतंय मला. ’प्रजापती गाढवाचा’ याच वरच्या चालीत अगदी सहज वाचता येईल अशी दुसरी म्हण बघ कसा उपहास करते. पक्षाध्यक्ष झालेला हा गृहस्थ आता ही, नवी झूल पांघरून गुजरात पासून सुरु करून परदेशात, स्वतःच्याच देशाची नाचक्की करत फिरतो आहे. आणि त्याचे लबाड अनुयायी सुद्धा देशात दंगे पेटवत फिरत आहेत.
गाढवाला शृंगारले, सगळ्या गावभर झाले.

अवंती : आहा... मेधाकाकू... वर्तमानातील परिस्थिती आणि लोकश्रुती यांचे, तू जुळवत असलेले हे सांधे मात्र फारच रंजक आहेत.

मेधाकाकू : आता असे बघ... कुठल्याही देशात, नागरिकांच्या सामाजिक आणि वैयक्तिक सवयी, शिस्त आणि वागणुकीवर आधारित कायदे केले जातात. आज, स्त्रियांवर होणारे अत्याचार, भर रस्त्यात गायची हत्या, संयम, सभ्यता आणि सौजन्याची सामाजिक शिस्तीची घडी मोडून राष्ट्रीय सरकार चालवणाऱ्या नेत्यांवर टीका करताना, संसदेसह सर्वत्र वापरली जाणारी असभ्य-अश्लील भाषा आणि विरोधाच्या नावाखाली होणारी दंगल-हिंसा-जाळपोळ हे, बदललेल्या भारतीय समाजाचे मानक आहे आणि म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कायदे नव्याने जात आहेत. काही शतकांपासून अस्तित्वात असलेला हा वाकप्रचार, आजच्या परिस्थितीला किती चपखल आहे. खरंच आपल्या पूर्वजांची सूक्ष्म निरीक्षण क्षमता. याचेच हे फलित.
जशी प्रजा वाईट वागती, तसे कायदे निघती.


अवंती : आहा... मेधाकाकु... अगदी खरेच तू सांगितलेस ते. जणू कालातीत असलेल्या या लोकोक्ती, लोकश्रुती, लोकसाहित्य, प्रत्येक पिढीचे. वास्तवाचे सतत प्रबोधन करत रहाणारेत. आजचा दिवस आणि अभ्यास खूप छान साजरा झाला आणि मी पुन्हा एकदा अवाक...!!
 
- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@