भाजयुमोची आज शहरात ‘तिरंगा एकता रॅली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : वेगवेगळ्या झेंड्यांखाली विविध समुदायाला एकवटून समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत असतानाच भाजयुमोच्या माध्यमातून सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देण्यासाठी शहरात सहा विभागात ही ‘तिरंगा एकता रॅली’ निघणार आहे.
 
 
भाजपसाठी सामाजिक समता सर्वात महत्त्वाची असून संविधान हा खरा धर्म आहे. या मोटारसायकल रॅलीत पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी व इतर सर्व लोकप्रतिनिधी सक्रिय सहभाग घेणार आहेत. तसेच शहरात ३० ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येईल व घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येईल. या उपक्रमात शहीद परिवार व सैनिक परिवार सहभागी होणार आहेत.
 
नाशिककर नागरिकांनी देखील या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजिंक्य साने, सरचिटणीस अमित घुगे, अमोल पाटील, संजय शिरसाठ, उपमहापौर प्रथमेश गिते, सागर परदेशी, हर्षद जाधव, शांताराम घंटे, चारुदत्त आहेर, मुकेश शहाणे, ऋषिकेश आहेर, काजल गुंजाळ, श्रद्धा देशपांडे, पूजा साळवे आदींनी केले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@