‘इंडिया पोल्ट्री एक्स्पो २०१८’ चे उद्यापासून आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रमुख पाहुणे

 
 
 
 
नाशिक : ग्रामीण भागातील शेतकरी हा फक्त शेतीवर अवलंबून असतो. मात्र, त्याने पूरक व्यवसाय जर केला तर शेतीतील होणारे नुकसान या व्यवसायातून भरून काढू शकतो. कुक्कुटपालन हा असाच व्यवसाय असून अंडी आणि कोंबडी खाद्य म्हणून देशात आणि राज्यात खूप मागणी आहे. त्यामुळे या व्यवसायातील संधी आणि त्यातून उत्तम उत्पन्न कसे मिळवता येईल ते सांगण्यासाठी ’इंडिया पोल्ट्री एक्स्पो २०१८’ चे दि. २७ जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहे.
 
या प्रदर्शनाची माहिती देण्याच्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला आयोजक बी. व्ही. शिवशंकर, डॉ. साहेबराव राठोड, डॉ. डी.बी. पाटील, डॉ. सीताराम शिंदे, डॉ. कृष्णा चाटणकर, सचिन इंगळे आणि भाजप उद्योग आघाडी नाशिकचे अध्यक्ष जितेंद्र अवस्थी उपस्थित होते.
 
तसेच नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे, नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप, देवयांनी फरादे, सीमा हिरे, देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नाशिकचे महापौर रंजना भानसी, वेंकटेश्‍वर हॅचरिजचे जनरल मॅनेजर डॉ. पी. जी. पेडगांवकर, पोल्ट्री ब्रिडर्स वेल्फेअरचे अध्यक्ष वसंतकुमार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्र शासन व पोल्ट्री व्यावसायिक यांच्या वतीने कुक्कुट पालनासंबंधी रोग निदान, पालनपोषण व आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक महत्त्व या विषयांवर चर्चा होणार आहे.
 
संपूर्ण देशातील नामवंत औषधी कंपन्या, कुक्कुट पालन इक्विपमेंट व तसेच कंत्राटी कंपनी यांनी होत असलेल्या येथे सहभाग नोंदविलेला आहे. यावेळी उभारण्यात येणार्‍या स्टॉलला भेट देऊन कुक्कुट पालनाचे महत्त्व जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. या पोल्ट्री एक्स्पो प्रदर्शनादरम्यान दि. २८ जानेवारीला भारतातील तज्ज्ञ डॉक्टर पोल्ट्री क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून, तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत कुक्कुटपालनातील रोगनिदान व निगा याविषयी मराठीतून व्याख्यान होणार आहे.
 
राज्यातील सर्व जनतेने या नाशिक पोल्ट्री एक्सो २०१८ अंतर्गत एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या एक्स्पोकरिता गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून पोल्ट्री जगतातील नामवंत कंपनी व कर्मचारी यांची भेट देणार आहेत. पोल्ट्री विषयक नवनवीन माहितीचे या निमित्ताने आदानप्रदान करण्यात येणार असून यांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे तेजस्वी इव्हेंटस् यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
एक्स्पो’च्या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
 
तेजस्वी इव्हेंटस् आणि पीपल फॉर पोल्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने व नाशिक पोल्ट्री फार्मस् यांच्या वतीने दि. २७ ते २९ जानेवारी दरम्यान ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉल रोड येथे ‘इंडिया पोल्ट्री एक्स्पो २०१८’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनही कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
 
@@AUTHORINFO_V1@@