भारताच्या सैन्य संचालनामुळे 'चीन' अस्वस्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |



बीजिंग : नवी दिल्ली येथे आज साजरा करण्यात आलेल्या ६९ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामुळे भारताचा शेजारी असलेला चीन अत्यंत अस्वस्थ झाला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ येथे भारतीय सैन्य दलांनी केलेल्या पथसंचालनामुळे चीनचा नाकाला मिरच्या झोंबू लागल्या आहेत. भारत आसियान देशांना घेऊन चीनविरोधात कट करत आहे. तसेच आपले शक्ती प्रदर्शन करून आशिया खंडात आपला दबदबा निर्माण करू पाहत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया चीनकडून दिली जात आहे.

आसियान देशांच्या नेत्यांची भारत भेट तसेच प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य दलांनी केलेल्या संचलनावर चीनच्या प्रसारमाध्यमांनी आक्षेप घेतला आहे. भारत आसियान देशांना एकत्र करून चीन विरोधात नवा कट रचत आहे, असा आरोप चीन वर्तमान पत्रांनी केला आहे. तर आज झालेल्या सैनिकी संचलनाला शक्ती प्रदर्शनाचे नाव देत भारत चीनला आपली शक्ती दाखवू पाहत आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या काही इलेक्ट्रोनिक मध्यामांनी दिली आहे. परंतु याचा चीनवर कसलाही परिणाम पडणार नसून भारत आसियान देशांना एकत्र करून जी खेळी खेळू पाहत आहे, ती देखील अयशस्वी होईल, असा विश्वास देखील चीनी माध्यमांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी फिलिपिन्समध्ये झालेल्या आसियान देशांच्या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आसियान देशांच्या प्रमुखांना भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार आसियान देशांचे प्रमुख हे भारत भेटीवर आले आहेत. आसियान देशांच्या या भेटीवर चीनने नाराजी व्यक्त केली होती.
@@AUTHORINFO_V1@@