ऍडव्हान्टेज अमित शाह !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2018
Total Views |
 

 
 
आता अमित शाह यांचे चांगले दिवस आले आहेत. कारण, आता ही लॉबी अमित शाहंच्या मागे लागली आहे असं दिसतं! अमित शाहंचे संघटनकौशल्य, निवडणुकीच्या व्यवस्थापनाचे अजोड तंत्र, कॉंग्रेसमुक्त भारताच्या ध्येयासाठी अपार कष्ट करण्याची तयारी या गुणांमुळे त्यांना राजकीयदृष्ट्या पराभूत करणं आपल्याला शक्य नाही, हे या मंडळींच्या लक्षात आले असावे. त्यामुळे त्यांनी आता आपल्या घाणेरड्या क्लुप्त्या (Dirty Tricks) वापरायला सुरुवात केली आहे.
 
 
संघाचा एक सर्वसामान्य प्रचारक ते भारताचे पंतप्रधान आणि जागतिक पातळीवरील एक प्रमुख नेते. नरेंद्र मोदी यांचा हा प्रवास थक्क करून टाकणारा आहे. या प्रवासाचं श्रेय अनेक गोष्टींना जातं. त्यांचं वक्तृत्व, संवाद साधण्याची हातोटी, त्यांचं कणखर व्यक्तिमत्त्व, प्रखर देशभक्ती, गुजरातमधील त्यांचं कर्तृत्व, यासारख्या अनेक गोष्टींबरोबरच या श्रेयाचा महत्त्वाचा वाटा जातो त्यांच्या विरोधकांकडे!
 
 
मिडीया, स्वयंसेवी संस्था, तथाकथित उदारमतवादी बुद्धिवंत, डाव्या विचारांचे लेखक आणि कलावंत या मंडळींची एक लॉबीच भारतात गेली साठ वर्षे कार्यरत आहे. कॉंग्रेसने अत्यंत चतुराईने या लॉबीला विविध मंडळांवरील नेमणुका, परदेशातील सेमिनार्सना जाण्याच्या संधी, ल्युट्येन्स दिल्लीतील शाही निवासस्थाने, पारितोषिके यासारख्या आमिषांद्वारे जपून आणि जोपासून ठेवलं आहे. संख्येने कमी असली तरी या मंडळींचा आवाज मोठा आहे. म्हणूनच उपद्रवमूल्यही. इतकं की या मंडळींना सगळेच वचकून असतात. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची हिंमत सहसा कोणी करत नाही. कारण, यांचा पगडा भारतापुरताच मर्यादित आहे असं नाही. जगभरातील मीडिया, विद्यापीठं, सांस्कृतिक संघटनांमध्ये डाव्या व तथाकथित उदारमतवादी मंडळींचं जाळं अतिशय ताकदवान आहे.
 
 
२००२ पासून या मंडळींनी मोदींना संपविण्याचा जणू विडाच उचलला आहे. सामान्य परिस्थितीतून आलेल्या, उच्चभ्रू रीतीरिवाजांची ओळख नसलेल्या, मुख्यमंत्रिपदाचा अनुभवही नसलेल्या या माणसाला आपण सहज संपवून टाकू, असा बहुदा सुरुवातीला यांचा समज असावा. पण, मोदींनी यांचा पुरता भ्रमनिरास केला. त्यांनी मीडियाशी ङ्गारसे संबंध न ठेवता कामावर लक्ष केंद्रित केलं. बघता बघता त्याचा परिणाम दिसू लागला. गुजरात बदलू लागला. प्रगतीपथावर भरधाव निघाला आणि विकासाचं आगळं-वेगळं ‘गुजरात मॉडेल’ तयार झालं.
 
 
यामुळे त्यांना संपविण्याच्या गमजा मारणारी मंडळी पुरती बिथरली. मोदींना संपविणं सोडा, पण धक्का देण्यासाठी, खजील करण्यासाठी, खाली बघायला लावण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. दंगलीत ज्यांना जीव गमवायला लागले, त्यांच्या नातेवाईकांना भरीस घालून खोटे खटले भरणे, अतिरेक्यांची एन्काऊंटर्स खोटी ठरवून त्यांना हुतात्मा ठरवणे, हे खटले गुजरातमध्ये न चालता इतर प्रांतात चालवावे यासाठी कोर्टावर दबाव आणणे, इतकंच काय तर मोदींना व्हिसा देऊ नये म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षांना अर्ज करणं यासारख्या अत्यंत हीन दर्जाच्या क्लुप्त्या त्यांनी लढविल्या. पण, याचा परिणाम उलटाच झाला! एकीकडे राज्याच्या विकासासाठी झपाटल्यासारखे कष्ट करणारे मोदी, तर दुसरीकडे त्यांचा पाणउतारा व्हावा म्हणून जंग जंग पछाडणारी ही लॉबी. हा विरोधाभास लोकांना जाणवला आणि आजवर मोदींबद्दल ङ्गारसं प्रेम नसणार्‍या अनेकांना त्यांच्याप्रती आपुलकी आणि आदर वाटू लागला. या अपयशाची ‘लॉबी’ला सवय नव्हती. आपल्या अपार शक्तीसमोर एक माणूस ताठ मानेने उभा राहतो. थांबत नाही, थकत नाही आणि झुकत तर त्याहूनही नाही, हे पाहून ते आणखीनच चवताळले. आंधळ्या द्वेषातून आणखीनच चुका करू लागले. यातूनच जितके ते विरोध करतील तितके मोदी अधिकच लोकप्रिय आणि मोठे होतील, हा सिलसिला सुरू झाला. यासाठीच मी सुरुवातीला म्हटलं तसं मोदींच्या यशाचं श्रेय त्यांच्या विरोधकांनाही जातं!
 
 
म्हणूनच म्हणावसं वाटतं की, आता अमित शाह यांचे चांगले दिवस आले आहेत. कारण, आता ही लॉबी अमित शाहंच्या मागे लागली आहे असं दिसतं! अमित शाहंचे संघटनकौशल्य, निवडणुकीच्या व्यवस्थापनाचे अजोड तंत्र, कॉंग्रेसमुक्त भारताच्या ध्येयासाठी अपार कष्ट करण्याची तयारी या गुणांमुळे त्यांना राजकीयदृष्ट्या पराभूत करणं आपल्याला शक्य नाही, हे या मंडळींच्या लक्षात आले असावे. त्यामुळे त्यांनी आता आपल्या घाणेरड्या क्लुप्त्या (Dirty Tricks) वापरायला सुरुवात केली आहे.
 
 
पहिल्यांदा त्यांनी जय शाह यांच्या व्यवसायासंबंधी अतिरेकी विधाने आणि आरोप करून बघितले, पण व्यवसाय आणि अर्थशास्त्राची तोंडओळख असलेल्या प्रत्येकाला हे आरोप किती हास्यास्पद आहेत हे लगेच लक्षात आलं. अमित शाह यांनीदेखील आरोप करणार्‍या पोर्टलवर १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकून आपल्याकडे लपविण्यासारखं काही नाही, हे सिद्ध केलं. कारण कोर्टात गेलं की या प्रकारणाची जाहीर चर्चा होणार, पुरावे पुढे येणार, उलटतपासणी होणार. त्यामुळे ज्याने काहीतरी चुकीचं केलंय तो कोर्टासमोर जाणं काही करून टाळणार हे उघड आहे!
 
 
हा बार ङ्गुसका निघाल्यावर त्यांनी न्यायमूर्ती लोया यांच्या २०१४ मध्ये झालेल्या मृत्यूचं प्रकरण उकरून काढलं आहे. यासंदर्भात त्यांनी केलेलं राजकारण हे तर घृणास्पद म्हणावं असंच आहे. हा खटला आपल्या पसंतीच्या न्यायमूर्तींसमोर चालावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींमध्ये बेबनाव घडवून आणला. यामुळे न्यायसंस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊन भारतीय लोकशाहीचं प्रचंड नुकसान होईल याचीही त्यांनी तमा बाळगली नाही. द्वेष माणसाला आंधळं करून सोडतो हेच खरं!
 
 
अर्थात, या आरोपातही काही दम नाही हे उघड झालंच आहे. न्यायमूर्ती लोया यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांच्या खोलीतच राहात असलेल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या चार न्यायमूर्तींनी त्यांना नैसर्गिक मृत्यू आल्याचं नि:संदेहपणे सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवालही हेच सांगतो आहे. लोयांच्या कुटुंबीयांनाही ‘‘आम्हाला घातपाताचा कुठलाही संशय नााही. त्यामुळे आता हा गदारोळ थांबवा व यापुढे आम्हाला त्रास देऊ नका,’’ अशी अक्षरश: विनंती केली आहे. ‘तरीही आमचंच खरं’ हा धोशा ही मंडळी काही दिवस लावतील. पण सुदैवाने न्यायालये शक्तिशाली लॉबीजच्या म्हणण्यानुसार नव्हे, तर पुराव्यानुसार निर्णय घेतात. त्यामुळे हा प्रयत्नही निष्ङ्गळ ठरणार हे स्पष्टच आहे.
 
 
जेव्हा काही मंडळी खोटी-नाटी कारणं उभी करून एखाद्याच्या मागे हात धुवून लागतात व ती व्यक्ती मात्र ध्येयावरील लक्ष विचलित होऊ न देता समर्पित भावनेने वाटचाल करताना दिसते तेव्हा लोकमत निश्चितपणे त्या व्यक्तीकडे अधिकच झुकू लागतं.
आधी मोदींच्या बाबतीत हे होताना आपण पाहिलं. आता अमित शाहंच्याबाबतही हेच होणार हे निश्चित. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की, असे विरोधक मिळायला नशीब लागतं!
 
 
- अभिजित जोग
@@AUTHORINFO_V1@@