भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |

  भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय 



जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आजपासून जोहान्सबर्ग येथे सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जोहान्सबर्ग येथील न्यू वंडेरियर मैदानावर या सामन्याला सुरुवात होत आहे. सलग दोन सामन्यामध्ये पराभव पत्करलेल्या हातातून गमावलेल्या कसोटी मालिकेचा तिसरा सामना जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय संघ आज मैदानात उतरत आहे. तसेच आजच्या सामन्यामध्ये भारताचा स्टार प्लेयर असलेल्या अजिंक्य राहणे याचा देखील भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेवटचा सामना भारत आपल्या खिशात घालेल अशी अपेक्षा सर्व क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


आफ्रिकेबरोबर झालेले या अगोदरचे दोन्ही सामने भारतीय संघाने गमावलेले आहेत. तीन सामन्याच्या या मालिकेमध्ये आफ्रिका संघाने ०-२ अशी अजिंक्य आघाडी घातलेली आहे. त्यामुळे आज सामना हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे संघाचा आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने देखील हा सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आजच्या सामन्यातील भारतीय संघ :
 



 
@@AUTHORINFO_V1@@