आपच्या 'त्या' आमदारांवर आज होणार सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या २० आमदारांच्या निलंबनासंबंधी आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे. आम आदमी पक्षाकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा विचार करून दिल्ली उच्च न्यायालय आपच्या या २० आमदारांना दिलासा देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या २० आमदारांच्या निलंबनाला दिलेल्या मान्यतेवर पुन्हा एकदा विचार केला जावा, तसेच लाभाच्या पदांच्या कथित आरोपांवर सर्व आमदारांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी आपने आपल्या याचिकेमध्ये केली आहे. ही याचिका काल न्यायालयात दाखल करण्यात आली होती, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने यावर बुधवारी म्हणजे आज सुनावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे थोड्याच वेळानंतर या प्रकरणावर न्यायालयाकडून सुनावणी करण्यात येणार असून न्यायालय कोविंद यांच्या आदेशावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विनंतीला मान देत गेल्या रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपच्या २० आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली होती. २०१५ च्या निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये बहुमताने विजयी झाल्यानंतर आपने आपल्या २० आमदारांना राज्याच्या विविध मंत्रालयांमधील लाभाची पदे दिली होती. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत या सर्व आमदारांचे निलंबन करण्याची विनंती राष्ट्रपती महोदयांना केली होती. या गेल्या रविवारी राष्ट्रपतींनी मान्यता देऊन या सर्व आमदारांची विधानसभा सदस्यता रद्द केली होती.
@@AUTHORINFO_V1@@