सायबर गुन्हयाविषयी युवकांमध्ये जनजागृती आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |

पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी.शेखर यांचे प्रतिपादन



अकोला :
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात होत असून यामुळे सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतांना सर्व नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे, तसेच सायबर गुन्हयाविषयी युवकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे' असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केद्रांचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी केले. ट्रान्सफॉर्मीग महाराष्ट्र प्रकल्पातंर्गत सायबर गुन्हयाविषयी जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, मुंबईच्या ॲक्सीस बँकेचे साहायक उपाध्यक्ष निशीकांत उपाध्ये, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम. आर. इंगळे व जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे तसेच मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मिर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेखर यांनी ऑनलाईन फ्रॉड विषयी माहिती देत नायजेरीयन फ्रॉड, बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांची फसवणूक ,एटीएम कार्डचे विवरण फोनव्दारे वयक्तिक माहिती विचारून फसवणूक करणे , ऑनलाईन लॉटरी चे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणे तसेच व्हॉटअॅप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमाव्दारे धार्मिक किंवा जातीय भावना दुखावतील असा मजकूर, व्हिडीओ, अश्लील फोटो पोस्ट करणे यासारखे अनेक सायबर गुन्हे मोठया प्रमाणात होत आहेत, असे ते म्हणाले. अशा प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांची सायबर सेल चोवीस तास दक्ष असून यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

याच बरोबर ॲक्सिस बँकेचे उपाध्यक्ष निशीकांत उपाध्ये यांनी पॉवर पॉईंट प्रेझेटेंशनव्दारे नेट बँकींग तसेच मोबाईल बँकींगचा उपयोग करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. इंटरनेट बँकींग १०० टक्के सुरक्षित असून इंटरनेट बँकींगचा वापर करतांना कोणतीही भिती ग्राहकाने बाळगू नये. असे त्यांनी सांगितले. येत्या काळात मोबाईल बँकीगचा मोठया प्रमाणात वापर होणार आहे. तरी ग्राहकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@