लालू प्रसाद यादव यांना सीबीआय न्यायालयाचा आणखीन दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |

चारा घोटाळ्यातील आणखीन एका प्रकरणात लालू आणि मिश्र दोषी





रांची :
बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणी रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना आणखीन एक दणका दिला आहे. आज झालेल्या विशेष न्यायालयाच्या सुनावणीमध्ये चारा घोटाळ्यातील आणखीन एका प्रकरणात न्यायालयाने लालू प्रसाद यादव आणि कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्र यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे यादव यांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे.

बिहारमधील चायबासा कोषागारमधून ३३ कोटी ६८ लाख ५३४ रुपयांचा निधी गैरमार्गाने काढून तो पैसा फिरवल्याच्या आरोपामध्ये न्यायालयाने मिश्र आणि यादव यांच्यासह एकूण ५० जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने अद्याप या सर्वांना देण्यात येणाऱ्या शिक्षेची सुनावणी केली नसून दुपारी २ वाजता होणाऱ्या आणखीन एका सुनावणीमध्ये मिश्र आणि यादव यांना या प्रकरणी देण्यात येणाऱ्या शिक्षेची सुनावणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान लालू यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि रा.स्व.संघावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील जनतेला हे माहित आहे कि, लालू प्रसाद यादव हे पूर्णपणे निर्दोष असून भाजप आणि संघाचा हा कुटील डाव आहे. लालू यांना या प्रकरणात मुद्दाम फसवले जात असून या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिली आहे.

बिहारमधील ९०० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्यासाठी चायबासा येथील कोषागारामधून लालू यादव आणि मिश्र यांनी ३३ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने काढून घेतली होती. यानंतर ही सर्व रक्कम आपापसात वाटून सर्व पैसे पचवल्या आरोप यवाद-मिश्र यांच्या आणखीन ५० अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता. यासंबंधी २००१ मध्ये बिहार न्यायालयाने चार्जशीट दाखल केली होती. तसेच देवधर येथील कोषागारामधून देखील अवैध्यरीत्या पैसे काढल्याच्या आरोपावर यादव यांना या अगोदरच दोषी ठरवण्यात आलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@