भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चीनी कंपनीची बांगलादेशातून हकालपट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |




ढाका : रस्त्याच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चीनमधील अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक कंपनी असलेल्या चायना हार्बर इंजिनिअर प्रा.लि. या कंपनीची बांगलादेश सरकारने बंगलादेशातून हकालपट्टी केली असून यापुढे चीनच्या या कंपनीला बांगलादेशात कसल्याही प्रकारचे काम देण्यात येणार नाही, असे बांगलादेश सरकारने जाहीर केले आहे.

बांगलादेशचे अर्थ मंत्री ए.एम.ए.मुहीत यांनी या विषयी माहिती दिली असून चीनच्या या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बांगलादेश सरकारबरोबर झालेल्या काही करारांनुसार ढाका ते सायलहेत येथील राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले होते. परंतु कंपनीकडून रस्त्याच्या कामासाठी देण्यात आलेला निधी दुसरीकडे वळवला गेला तसेच सरकारने या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या पैशाच्या आकडेवारीमध्ये देखील फेरबद्दल करण्याचा प्रयत्न केल्याचे मुहीत यांनी सांगितले. त्यामुळे या कंपनीकडून रस्त्याचे कंत्राट काढून घेण्यात आले असून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

चायना हार्बर ही चीनमधील अत्यंत नावाजलेली कंपनी आहे. चीन सरकारच्या मदतीने आजपर्यंत चीन बाहेरील अनेक देशांमधील बांधकामाची कंत्राटे या घेतलेली आहे. पाकिस्तानमधील ग्वादर आणि श्रीलंकेमधील हंबनटोटा या दोन बंदराच्या निर्मितीचे काम देखील याच कंपनीने केले होते. तसेच भारतामध्ये देखील या कंपनीची अनेक कामे सध्या देशभरात सुरु आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@