कन्नूर हिंसाचार - वरुण गांधींनी दिला एक महिन्याचा पगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

 
कन्नूर येथे कम्युनिस्ट हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी भाजप नेते व सुलतानपूर येथील खासदार वरुण गांधी यांनी आपला एक महिन्याचा पगार मदत म्हणून दिला आहे. १ लाख रुपयांची राशी धनादेशद्वारे त्यांनी समर्पित केली आहे.
 
 
कम्युनिस्ट हिंसाचाराचा मोठा किल्ला असलेल्या कन्नूर येथे काही दिवसांपूर्वीच श्याम प्रसाद (वय - २४) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. श्याम प्रसाद आयटीआय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या महाविद्यालयातून श्याम प्रसाद आपल्या घराकडे येत असताना तोंडावर कापड गुंडाळलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. श्याम प्रसादने निसटून जाण्याचा प्रयत्न केला. तो जवळच्या घरात आसऱ्यासाठी जात असतानाच व्हरांड्यातच त्याच्यावर वारंवार धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर श्याम प्रसादला इस्पितळात नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.
 
 
 
गेल्या १९ महिन्याच्या पिनराई विजयन सरकारच्या कार्यकाळात अद्याप १८ संघ कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्या होत आहेत. विशेषत: कन्नूर हा मुख्यमंत्र्यांचे गृह जिल्हा असून देखील तेथे सर्वात जास्त संघ कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहे. यावर अनेक स्तरातून टीका केली जात असताना देखील कुठलीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे हे हत्यासत्र कधीपर्यंत चालेल हा सवाल विचारला जात आहे.
 
 
या सर्वांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातून विविध मदत निधी दिला जात आहे. आज खासदार वरुण गांधी यांनी यात आपले योगदान दिले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@