अमेरिकन दूतावासाचे पुढील वर्षी जेरुसलेममध्ये स्थलांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांची इस्राइलमध्ये घोषणा




तेलअवीव : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेप्रमाणे अमेरिकेच्या इस्राइलमधील दूतावासाचे पुढील वर्षी जेरुसलेममध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी केली आहे. तेल अवीव येथे आयोजित इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि माईक पेन्स यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
अमेरिका आणि इस्राइल यांच्यात अत्यंत दृढ असे संबंध आहेत. आपल्या देशांमध्ये शांतता आणि सुरक्षितता नांदावी यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहे. त्यामुळे कट्टरपंथीय इस्लामिक दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना नेहमी सहाय्य करतील' असे वक्तव्य पेन्स यांनी यावेळी केले. तसेच आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या विकासासाठी देखील दोन्ही देश कायम कटिबद्ध राहतील, असे ते म्हणाले आहेत.

याच बरोबर पॅलेस्टाईन बरोबर असलेले संबंध सुधारण्यावर देखील अमेरिका भारत देत असल्याचे त्यांनी म्हटले. पॅलेस्टाईनच्या मनात असलेल्या अनेक शंका आणि प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळतील त्यामुळे पॅलेस्टाईनबरोबर चर्चा करण्यासाठी अमेरिका सज्ज असून पॅलेस्टाईनने देखील या चर्चेला पुढे येऊन जेरुसलेमला आपला मान्यता द्यावी, असे पेन्स यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@