हदिया प्रकरणात विशेष चौकशी नाही : सर्वो. न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |




नवी दिल्ली :
केरळमधील बहुचर्चित हदिया लव्ह जिहाद प्रकरणी कसल्याही प्रकरची विशेष चौकशी केली जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिले आहे. हदिया ही पूर्णपणे प्रौढ असून आपण विवाहित असल्याचे तिने मान्य केले आहे, त्यामुळे तिच्या व्यक्तिगत वैवाहिक जीवनामध्ये हस्तक्षेप करणे हे कायद्याला काळिमा फासणारी गोष्ट ठरू शकते, असे देखिल न्यायालयाने म्हटले आहे.

हदिया प्रकरणी न्यायालयाने विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेचे साहाय्य घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी हदिया संबंधी दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेमध्ये करण्यात आली होती. परंतु हदिया ही पूर्णपणे प्रौढ असून आपण विवाहित असल्याचे तिने स्वतः मान्य केलेले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच विवाह आणि गुन्हा हा दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असून त्यामुळे विवाहाची कायद्याच्या दृष्टीने चौकशी केलेल्याने आपण एक वेगळी परंपरा निर्माण करू जी पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे या प्रकरणी तपास यंत्रणेचे सहाय्य घेतले जाऊ शकत नाही' असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान हदिया प्रकरणी पुढील सुनावणी ही २ फेब्रुवारीला करण्यात येणार असून याचिकेमधून नवे बदल करण्याचे असल्याच ते करत येऊ शकतील, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.





 
न्यायालयने दिलेल्या स्पष्टीकरणाचे काही विचारवंतांकडून स्वागत करण्यात येत आहे. 'अखेरकार न्यायालयने आपले स्पष्टीकरण देऊन स्त्रियांची स्वायत्त राखली आहे' अशी प्रतिक्रिया बरखा दत्ता यांनी दिली आहे.



@@AUTHORINFO_V1@@