दावोस येथे पंतप्रधान मोदींची जगभरातील उद्योजकांबरोबर चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

डब्ल्यूइएफच्या बैठकीला आज करणार संबोधित





दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८ व्या वार्षिक बैठकीसाठी भारतातून स्वित्झर्लंडला रवाना झालेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. स्वित्झर्लंड येथे पोहचल्यानंतर स्विस राष्ट्रपती एलेन बेरसेट यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी दावोस येथे आलेल्या जगभरातील उद्योजकांशी आज सकाळी चर्चा केली असून या सर्व उद्योजकांनी भारतामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. 

भारतातून दावोससाठी रवाना झालेल पंतप्रधान मोदी काल रात्री दावोस येथे पोहचले. याठिकाणी भारतीय अधिकारी आणि स्वित्झर्लंडमध्ये भारतीय नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वित्झर्लंड सरकारचे अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित होते. यानंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती एलेन बेरसेट यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत त्यांचे स्वागत केले. तसेच भारताची होत असलेली प्रगती आणि भारत-स्वित्झर्लंड यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर त्यांनी भाष्य केले. काही काळ दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर बेरसेट यांनी मोदींना निरोप दिला. यानंतर याठिकाणी परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या जगभरातील व्यावसायिकांची पंतप्रधान मोदींनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.


डब्ल्यूइएफच्या आजच्या दुसऱ्या दिवशी जगभरातून आलेले विविध देशांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळे व्यावसायिक-उद्योजकांच्या या सत्राला आज सुरुवात होणार आहे. या सत्रामध्ये सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण असणार आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली वाढ आणि नव्या उद्योगांना भारतात असलेला वाव या विषयी पंतप्रधान मोदी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारमधील काही मंत्री आणि अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित असणार आहेत.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पाच दिवसीय परिषदेला कालपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातील कलाजगतातील काही कार्यक्रम आणि मान्यवरांचे स्वागत करून या परिषदेला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय अभिनेता शाहरुख खान याला देखील क्रिस्टल अवॉर्ड देऊन काल सन्मानित करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@