मेजर एफकेके सिरकार यांच्या पार्थिवावर शाही इतमामात अंत्यसंस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

 
अलाहाबाद : उत्तर प्रदेश येथील १०१ वर्षीय मेजर एफकेके सिरकार यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय लष्करात त्यांचे एक अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे स्थान होते. ते आसाम रेजिमेंटच्या द्वितीय बटालियनचे जवान होते. 
 
 
 
 
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे द्वितीय विश्व युद्ध, १९४७-४८ चे भारत पाकिस्तान युद्ध आणि १९६२ मधील भारत चीन युद्धात लढणारे आता पर्यंत हयात असलेले ते एकमेव सैन्य अधिकारी होते.
 
१९४७-४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी मोलाची कामगिरी करत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्यावर आज पुष्पांजली अर्पण करत अलाहाबाद येथे शआही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@