भौतिक वास्तूबरोबरच सामाजिक रचना मजबूत करण्यावर भर हवा : भैय्याजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : भौतिक वास्तूबरोबरच सामाजिक रचना मजबूत करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. वनवासी कल्याण आश्रमाने सुरगाणा तालुक्यातील गुही येथे बांधलेल्या वसतिगृहाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
 
अत्यंत दुर्गम अशा गुही येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून वनवासी बालकांसाठी आश्रमशाळा चालविली जाते. ४५० विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या भागात शिक्षणाची कुठलीही सुविधा नव्हती, त्याकाळात १९८६ साली कल्याण आश्रमाने हे शैक्षणिक संकुल सुरू केले होते.
 
या संकुलाच्या विस्तारीकरणाचा एक भाग म्हणून २०० मुलींसाठी एक सुसज्ज वसतिगृह बांधण्यात आले आहे. या वसतिगृहाचे आज उद्घाटन झाले. यावेळी कल्याण आश्रमाचे अ.भा. संघटनमंत्री सोमयाजुलु व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी या वसतिगृहासाठी ज्या देणगीदारांनी देणग्या दिल्या त्यांचाही सन्मान करण्यात आला. वनवासी विषयाचे अभ्यासक भास्कर गिरिधारी यांनी लिहिलेल्या ’वनवासी विश्व’ या ग्रंथाचे प्रकाशन भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले
 
@@AUTHORINFO_V1@@