धनंजय दातार यांची २६ जानेवारीला प्रकट मुलाखत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |
 

 

नाशिक : नाशिकमधील ‘संस्कृती वैभव’तर्फे येत्या २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘उद्योगप्रेरणा’ या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
 
‘मिती क्रिएशन्स’निर्मित हा कार्यक्रम गंगापूर रस्त्यावरील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृहात होणार असून त्यात दुबईतील मसालाकिंग धनंजय दातार यांची मुलाखत प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने घेणार आहेत. उद्योग-व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना धनंजय दातार योगायोगानेच व्यवसाय क्षेत्रात आले, परंतु जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी परदेशात एक जागतिक ख्यातीचा उद्योगसमूह निर्माण करून दाखवला.
 
@@AUTHORINFO_V1@@