'पद्मावत' विरोधात पुन्हा उसळला जनक्षोभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

हरियाणा : संजय लीला भन्साळी याचा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'पद्मावत' या बहुचर्चित चित्रपटामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा जनक्षोभ उसळला असून उत्तरेत राजस्थानसह हरियाणामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांनी तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्यामुळे हरियाणा आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये पोलीसांनी सुरक्षा वाढवली असून काही भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था देखील तैनात केली आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात, मध्यप्रदेश हरियाणा आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये 'पद्मावत' चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीला हटवत चित्रपट प्रदर्शित करण्याचे आदेश या राज्यांना दिले आहेत. त्यामुळे हरियाणा आणि राजस्थानमध्ये या विषयी तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. हरियाणामध्ये काही ठिकाणी संतप्त जमावाने चालत्या बसवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. या दगडफेकीमुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे.

राजस्थानमध्ये देखील चित्रपटाला विरोध करणाऱ्या नागरिकांनी चित्रपटगृहांवर हल्ले करत, त्याठिकाणी तोडफोड केली आहे. भिलवारा येथील एका तरुणाने चित्रपटाच्या विरोधासाठी ३५० फुट उंच मोबाईल टॉवरवर चढून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी परिस्थिती योगरित्या हाताळत त्या तरुणाला खाली उतरवले.
सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटावरील बंदी मागे घेण्याचा आदेश दिल्यानंतर राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या चारही राज्यांनी सर्वो. न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. जनसामन्यांच्या भावनेचा विचार करून न्यायालयाने या चित्रपटासंबंधी दिलेल्या निकालावर पुन्हा एकदा विचार करावा, असे या राज्यांनी म्हटले आहे. या संबंधी सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@