माणिक सरकारला 'लाल सरकार'चा धसका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |

 
मुंबई : त्रिपुरा या राज्याची खरी परिस्थीती दाखवण्यासाठी अभिजीत अशोक पॉल घेवून येत आहेत लाल सरकार हा चित्रपट, मात्र जेव्हा पासून असा चित्रपट येणार हे घोषित झाले होते, तेव्हा पासूनच या चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे. डाव्या विचारसरणीच्या या सरकराला मात्र हा चित्रपट येवू नये अस वाटते आहे. मात्र या चित्रपटाच्या संघातर्फे " हा चित्रपट कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही, तर केवळ राज्याची परिस्थीती दाखवणारा आहे." असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
 
लाल सरकार डाव्या पक्षाच्या विचारसरणीला नाही तर त्रिपुरा राज्याच्या सद्य परिस्थितीला दाखवण्यासाठी प्रदर्शित करण्यात येत आहे, असे या चित्रपटातर्फे सांगण्यात आले आहे. ज्याप्रमाणे पीपली लाईव्ह, उडता पंजाब हे सिनेमे त्या त्या राज्यांच्या परिस्थितीचे दर्शन घडवतात, त्याच प्रमाणे हा चित्रपट त्रिपुरा राज्याच्या परिस्थितीवर आधारित आहे, असेही चित्रपटातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 

 
 
  
हा चित्रपट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्रिपुरा येथे १८ फेब्रुवारीला निवडणूका आहेत. असे म्हणतात चित्रपट समाज मनाचा आरसा असतात, त्यामुळे या चित्रपटाचा देखील तेथील समाजावर परिणाम होणार का? आणि तसे झाले तर याचा सरळ परिणाम त्रिपुरा येथील निवडणुकांवर होणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
 
डाव्या संघटनांनी या चित्रपटाचा पुरेपूर विरोध केला आहे, मात्र सध्या संपूर्ण देश पद्मावतच्या वादात गुंग असल्याने याकडे कुणाचे लक्ष गेले नाही असे दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पॉल यांनी केले आहे, तर याचे निर्माता आहेत सुशील शर्मन. त्रिपुरा येथे गेल्या २५ वर्षात सत्तेत असलेल्या डाव्या सरकारची ही कथा. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झा्ल्यानंतर अनेक वादांचा जन्म होवू शकतो. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काय होते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@