जिभाऊ करंडकचे सातत्य हेच या स्पर्धेचे यश - दिनानाथ मनोहर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 

 
 
नंदुरबार : जिभाऊ करंडकच्या माध्यमातून सादर होणार्‍या एकांकीकेतून सद्यस्थितीवर नक्कीच भाष्य होईल. नाटक समाज प्रबोधनाचे साधन आहे. याच्यातून देशात घडणार्‍या विविध घडामोडींचे भाष्य होत असते. जिभाऊ करंडकचे सातत्य हेच या स्पर्धेचे यश आहे, असे प्रतिपादन साहित्यीक दिनानाथ मनोहर यांनी केले. ते येथील जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
 
राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शंकर पाटील, साहित्यीक प्रभाकर भावसार, आत्माराम इंदवे, अॅड. प्रकाश भोई, निलेश तवर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, रोटरी क्लबचे सचिव पंकज पाठक आदी उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी बोलतांना उद्योजक म्हणाले की, जिभाऊ करंडक ही नाट्य स्पर्धा नंदुरबार शहरासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी भुषणावाह आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात नंदुरबार शहराचे नाव पोहोचले आहे. या स्पर्धेला असेच सातत्य टिकण्यासाठी शहरातूनही मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार आयोजक नागसेन पेंढारकर यांनी केले. दोन दिवसात होणार्‍या या स्पर्धेचे परिक्षण सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी, मुंबई विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश मनसोडे, प्रबंधक गीत व नाट्य प्रभाग, सुचना व प्रसारण मंत्रालय, चैन्नई, भारत सरकारचे डॉ. जितेंद्र पानपाटील हे करीत आहेत.
 
आज मोरया नाट्यसंस्था अमळनेर-एंडोसल्फान, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगांव-कमांड एचटूओ, आई तुळजाई सर्वांगिण विकास संस्था धुळे-पुरुषार्थ, अजंता आर्ट सर्कल धुळे-पंच्चावन्न आणि साठीतले प्यादे, क्रिशयुग ऍकेडमी नागपूर-सांबरी या एकांकीकेचे उशिरापर्यंत सादरीकरण सुरु होते. आज दि.२१ जानेवारी रोजी एकुण नऊ एकांकीकेचे सादरीकरण होणार आहे. या सर्व एकांकीका पाहण्यासाठी जिल्हावासियांनी नाट्य गृहात येण्याचे आवाहन आयोजन समितीचे नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, संजय मोहिते, रविंद्र कुलकर्णी, राजेश जाधव, आशिष खैरनार आदींनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@