दावोसच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. नवी दिल्ली येथील विमानतळावरून आज त्यांनी दावोस दौऱ्यासाठी उड्डाण केले आहे. ४८ व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी नरेंद्र मोदी दावोस शहराच्या दौऱ्यावर गेले आहेत. ही परिषद आर्थिक विषयातील जगातील सगळ्यात मोठी परिषद मानली जाते.
 
 
 
 
पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये व्यापार, कला, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रासंबंधी चर्चा होणार असून या परिषदेमध्ये वरील क्षेत्राशी निगडीत ३००० पेक्षा जास्त लोक भाग घेणार आहेत. या परिषदेमध्ये योगवर विशेष सत्र आयोजित केले गेले आहे. जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांनी योगाला पोहोचविले असल्याने या परिषदेमध्ये योगावर विशेष सत्र आयोजित केले गेले आहे.
 
 
यामध्ये ७० पेक्षा जास्त देशांचे अध्यक्ष योगा करतांना आपल्याला दिसणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रँप तसेच अन्य प्रमुख अधिकारी योगा करतांना या परिषदेमध्ये दिसणार आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@