न्या. लोया मृत्यू प्रकरणी पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : दिवंगत न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता २ फेब्रुवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित पडलेल्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज स्वतःकडे हस्तांतरित करून घेतल्या आहेत.
 
 
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज स्वतः या प्रकरणाची सुनावणी केली असून यावर सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णय जाहीर केला आहे. या प्रकरणासंबंधी संपूर्ण माहिती तसेच या प्रकरणाशी संबंधीत सगळ्या पक्षांनी न्यायालयात माहिती सादर करावी असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
 
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयात केली. यामध्ये न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या बंडखोरीनंतर सरन्यायाधीशांनी लोया यांचे प्रकरण अरुण मिश्रा आणि त्यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडून आपल्याकडे घेतले होते. त्यामुळे आज या प्रकरणावर काय सुनावणी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 
 
 
दरम्यान लोया यांच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या नागरिकांपैकी एक असलेले बंधुराज लोन यांनी याविषयी आनंद व्यक्त करत, सरन्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे काम एका स्वतंत्र संस्थेला देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी योग्य तपास करून त्यावर सुनावणी केल्यावरच त्यांना योग्य न्याय मिळेल, असे लोन यांनी म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@