हरियाणामधील पानीपत रिफायनरीमध्ये , स्फोट एकाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
हरियाणा: हरियाणामधील पानीपत रिफायनरीमध्ये आज स्फोट झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून यात चार नागरिक जखमी झाले असल्याची माहिती सध्या मिळत आहे. जखमी नागरिकांवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
हा स्फोट कसा झाला याचा पत्ता अद्याप लागला नसल्याने याचा शोध घेतला जात आहे. दुपारी एकच्या दरम्यान अचानक कारखान्यात मोठा आवाज ऐकायला आला त्यामुळे नागरिकांमध्ये एकच झुंबड उडाली आणि सगळे जण इकडेतिकडे पळू लागले. यावेळी बचाव पथक देखील त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या स्थळामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवले.
 
पानीपत रिफायनरीमधील नेप्था क्रैकर प्लांटमध्ये स्पोट झाला असल्याचे सध्या सांगितले जात आहे. बचाव कार्य सध्या जोरात सुरु आहे. अजून मृतांचा आकडा स्पष्ट झाला नसल्याने बचाव पथक आपले काम करीत आहे. 
@@AUTHORINFO_V1@@